स्कॉलरशिप, नवोदय, एम टी एस, एम. एम. एस. आणि इतर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र
svmsbharat.org येथे आपले मनःपूर्वक स्वागत आहे! महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची सखोल आणि परिपूर्ण तयारी करून देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट निर्माण केली आहे. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शन देणे नाही, तर त्यांच्यामध्ये स्व-शिक्षणाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक परीक्षांची भीती कमी करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच आहे.
२०१९ पासून आजपर्यंत, आम्ही एमटीएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये २५०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले आहे. आमच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातच उल्लेखनीय यश मिळवले आहे.
svmsbharat.org हे केवळ अभ्यासक्रमाचे शिक्षण न देता प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध शैक्षणिक साधने, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि नियमित चाचण्यांचे आयोजन करते. आमचा अनुभव आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील सकारात्मक संवाद हीच आमची खरी ताकद आहे.आमचा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना आधुनिक स्पर्धेच्या स्तरावर सक्षम बनवणे आहे.
आमची टीम तुम्हाला सेवा द्यायला सदैव तत्पर आहे.
Live Chat Time
10:00 am To 09:00 pm
24 X 7 Chatbot Support
कारेपूर, जिल्हा - लातूर
Privacy Policy|Terms & Condition |Refund Policy | Designed by Shabas Guruji |Copyrights @ 2024